वीज पडून दोन महिला ठार, पाच जखमी, सोनेघाट शेत शिवारातील दुर्दैवी घटना

रामटेक – तालुक्यातील सोनेघाट शिवारात शुक्रवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असलेल्या महिलांवर वीज कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच महिला गंभीर जखमी झाल्या. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतात कामकाज सुरू असताना ही दुर्घटना घडली.
ही घटना सरोनेघाट येथील शेतकरी रमेश जगन्नाथ यांच्या शेतात घडली. मृतांमध्ये मंगलाबाई जीवन मोटघरे (वय 40, रा. परसोडा, रामटेक) व वर्षा देवचंद्र हींगे (वय 33, रा. भाजापूर, रामटेक) यांचा समावेश आहे.
या घटनेत जखमी झालेल्या महिलांची नावे
जयश्री आकाश जवादे (वय 30),रंजू आष्टेकर (वय 38),वनिता गनानन नागरीकर (वय 55) — सर्व रा. रामाळेश्वर, रामटेक,कलाबाई कवळू वरघणे (वय 60),प्रमिला वासुदेव आष्टणकर (वय 49) — दोघी रा. भाजापूर, रामटेक
सर्व जखमी महिलांना तातडीने रामटेक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून योग्य मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.