विदर्भाला पावसाने झोडपले ; 6 नागरिकांचा मृत्यू, गुरं वाहून गेली, नागपूरला आजही ऑरेंज अलर्ट
नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती असून घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागात मोठी पडझड झाली असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत .अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे . गेल्या 24 तासांत नागपूर शहरात . मिमी तर जिल्ह्यात सरासरी 139.6 मिमी पावसाची नोंद झाली .अनेक नद्यांना पूर आलाय . परिसरात दाणादाण उडाली आहे . हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
नागपूरमध्ये पुरपरिस्थितीने दाणादाण
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्तिक लाडसे आणि अनिल पानपत्ते हे दोघे नाल्यात वाहून गेले. कार्तिकचा मृतदेह सापडला असून अनिलच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर शहरात . मिमी तर जिल्ह्यात सरासरी 139.6मिमी पावसाची नोंद झाली. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे नागनदी, पोहरानदी आणि पिवळी नदीला पूर आला. परिणामी शहरातील 50पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. 23रस्ते जलमय झाले असून अनेक भागांत वाहनांची हालचाल ठप्प झाली होती. नागपूर महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने पुरात अडकलेल्या 47 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं.
नागनदीची सुरक्षा भिंत कोसळली
रामदासपेठ भागातील कॅनल रोडवर नागनदीची सुरक्षा भिंत पावसामुळे खचली आहे. सेवा सदन शाळा आणि महाविद्यालयाच्या मागे ही भिंत कोसळली असून एक मोठा जनरेटर नदीत वाहून गेला आहे. या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे