विदर्भात ‘महा स्माइल्स’ मोहीम सुरु – हास्याला नवसंजीवनी! क्लेफ्ट उपचारासाठी स्माइल ट्रेन आणि बजाज फिनसर्व एकत्र

नागपूर : – स्माइल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भात ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट जागरूकता मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने प्रेरित झालेल्या या ९० दिवसांच्या मोहिमेचा शुभारंभ नागपूर येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलमध्ये झाला.
LED स्क्रीनसह सुसज्ज अशा तीन विशेष वॅन्स नागपूर, अकोला आणि वर्धा विभागातील ग्रामीण भागात जनजागृती करतील. या वॅन्सद्वारे क्लेफ्ट म्हणजेच ओठ व तालूतील जन्मजात विकृतीवरील मोफत उपचार व हेल्पलाइन क्रमांक (1800 103 8301) यांची माहिती देण्यात येणार आहे.
स्माइल ट्रेनच्या रेणु मेहता यांनी सांगितले की, ही मोहीम एक सामाजिक आंदोलन आहे – प्रत्येक मुलाला स्पष्ट बोलण्याचा, खाण्याचा आणि खुल्या मनाने हसण्याचा हक्क आहे.
बजाज फिनसर्व CSR अध्यक्ष कुरुश ईरानी यांनी या भागीदारीतून वेळेत शस्त्रक्रियेसाठी रिफरल प्रक्रिया बळकट केली जात असल्याचे सांगितले.
ही मोहीम २०२६ पर्यंत महाराष्ट्रभर ८,००० शस्त्रक्रिया, २०,००० आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि राज्यव्यापी जनजागृतीचे उद्दिष्ट साधणार आहे.