महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

विदर्भातील ६०० मेगावॅटचा प्रकल्प वीज निर्मिती प्रकल्प अदानीच्या ताफ्यात

(व्हीआयपीएल) हा वीज निर्मिती प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) ने घेतला

नागपूर : नागपूर जिल्यातील बुटीबोरी येथील दिवाळखोरीत निघालेला विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा वीज निर्मिती प्रकल्प भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) ने घेतला आहे. त्यामुळे अदानीची वीज निर्मिती क्षमता वाढणार आहे.

अदानी पॉवर कंपनीची वीज निर्मियी क्षमता आता १८,१५० मेगावॅट आहे. कंपनीकडून २०२९-३० पर्यंत ही वीज निर्मिती क्षमता ३०,६७० मेगावॅट गाठण्याच्या प्रयत्न आहे. बुटीबोरीतील व्हीआयपीएल हा नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित वीज निर्मिती प्रकल्प आहे. येथे ३०० मेगावॅटचे दोन वीज निर्मिती संच आहे. हा प्रकल्प अदानी कंपनीने ४ हजार कोटी रुपयांच्या एकूण मोबदल्यात अधिग्रहण केला आहे.

 

व्हीआयपीएल हा कोळशावर चालणारा वीज प्रकल्प आहे.

व्हीआयपीएल ही कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. कंपनीची कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू होती. १८ जून २०२५ रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या माननीय मुंबई प्रक्रिया सुरू होती. १८ जून २०२५ रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या माननीय मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या निराकरण योजनेला मान्यता दिली. त्यानंतर, ७ जुलै २०२५ रोजी ही योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यात आली.

या अधिग्रहणासह अदानीची वीज निर्मिती क्षमता १८ हजार १५० मेगावॅटपर्यंत पोहचणार आहे. अदानी ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे त्यांच्या व8ज निर्मिती क्षमतेचा विस्तार करत आहे. ते सध्या मध्य प्रदेशातील सिंगरौली- महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा आणि राजस्थानमधील कवई येथे प्रत्येकी १ हजार ६०० मेगावॅट क्षमतेचे सहा ब्राउनफिल्ड अल्ट्रा- सुपरक्रिटिकल पॉवर प्लांट (यूएससीटीपीपी) बांधत आहे, त्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १ हजार ६०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीनफिल्ड यूएससीटीपीपी आहे. याशिवाय, ते कोरबा येथे पूर्वी घेतलेल्या १ हजार ३२० मेगावॅट क्षमतेच्या सपरक्रिटिकल पॉवर प्लांटच्या बांधकामाचे पुनरुज्जीवन देखील करत आहे. यासह, एपीएल २०३० पर्यंत ३० हजार ६७० मेगावॅट क्षमतेच्या ऑपरेशनल क्षमतेसह भारतातील सर्वात मोठी खाजगी बेस लोड पॉवर जनरेशन कंपनी म्हणून आपले स्थान मजबूत करत असळताचा कंपनीचा दावा आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button