महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
वर्ध्यातील चाणनकी येथे चार कामगार यशोदा नदी पात्रात अडकले
वर्धा – जिल्ह्यातील चाणनकी या गावांमध्ये चार मजूर यशोदा नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये अडकले आहे. रेस्क्यू टीम कानगाव मार्गे येथे पोहचली असून मजुरांना पाण्याच्या वेड्यातून बाहेर काढणे सुरू आहे. घटनास्थळी हिंगणघाट तहसीलदार योगेश शिंदे,अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले व टीम नदीकाठावर पोहचले आहे. लोकांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरूआहे. पाण्यामध्ये अडकलेले लोक बबलू विश्वकर्मा व दिनेश यादव व उमाशंकर वरखेडे व शिवकुमार उईके रा. छत्तीसगड ह. मु चानकी हे बांधकाम मजूर आहेत.