महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
यवतमाळच्या साकुर येथे अघोरीकृत्याचा प्रयत्न; पाच आरोपी अटकेत, एक फरार

यवतमाळ – तालुक्यातील साकुर गावात अघोरीकृत्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साकुर येथील एका घरात काही व्यक्ती अघोरीकृत्य करत असल्याची शंका होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, घराच्या एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आढळून आला.
या खड्ड्याच्या आजूबाजूला लिंबू, नारळ, ओटीसाठीचे साहित्य व इतर संशयास्पद वस्तू सापडल्या. घटनास्थळा वरून आकाश कोटनाके, कुणाल खेकारे, वृषभ तोडसकर, प्रदीप इळपाते आणि बबलू येरेकर या पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.