महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या कामांची पाहणी 

अमरावती: – अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज बेलपुरा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महापालिकेच्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांची पाहणी केली.

 

यामध्ये महानगरपालिका प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा क्र. ७, महानगरपालिका प्राथमिक हिंदी सेमी इंग्रजी शाळा क्र. ३, तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र यांचा समावेश होता. या नव्याने बांधलेल्या शैक्षणिक व आरोग्य सुविधा नागरिकांसाठी लवकरच खुल्या होणार आहेत.

 

तसेच दरोगा प्लॉट, कहेकशा कॉलनी व काझीयान नगर येथे सुरु असलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या बांधकामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. या सर्व प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व सुविधा कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सदर परिसरातील नागरिकांशी आयुक्तांनी यावेळी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button