महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
अपार्टमेंटचा गार्डच निघाला चोर,अपार्टमेंटमधून चोरीला गेलेली कार २४ तासांत जप्त

नागपूर : – गिट्टीखदान परिसरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेलेली ए-स्टार कार केवळ २४ तासांत नागपूर पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कारचालक पार्थ चटोपाध्याय यांनी २९ जुलै रोजी आपली कार पार्किंगमध्ये लावली होती. मात्र दुसऱ्या दिवशी ती गायब झाली. त्यांनी तात्काळ गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास सुरु केला असता अपार्टमेंटमधीलच सुरक्षा रक्षक सोनू भारद्वाज हा घटनेनंतरपासूनच गायब असल्याचे उघड झाले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चोरी गेलेली कारही हस्तगत केली.
पोलिसांच्या जलद कारवाईमुळे फक्त २४ तासांत प्रकरणाचा उलगडा झाला असून, नागरिकांतून समाधान व्यक्त केलं जात आहे.