अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिक रस्त्यावर: तब्बल एक तास महामार्गावर केला चक्का जाम

हिंगणघाट : – संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांचे दुसरी कडे पुनर्वसन करान्यायासाठी हा रस्ता रोखण्यात आला. सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते व परिसरातील नागरिक संविधान चौकात बसून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शिवसेनेचे सतीश धोबे, काँग्रेसचे पंढरी कापसे, प्रवीण उपासे, समाजसेवक सुनील डोंगरे, राजू भाईमारे, हुकेश धोकपांडे,राष्ट्रवादीचे महेश झोटिंग, विनोद वानखेडे, ज्वलंत मुन , मिलिंद कोपूलवार, मनसेचे केतन तायवाडे,
दशरथ ठाकरे, बालू वानखेडे
अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, श्रीकांत भगत , रागिनी शेंडे ,सीमा तिवारी, सुचिता जांभुळकर, बालू अनासाने, प्रवीण श्रीवास्तव सह अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक रस्त्यावर बसले होते. कलोडे सभागृह पुढील या झोपडपट्टीमुळे परिसरातील नागरिकाला मोठा त्रास आहे.
संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाश्यांना अतिशय त्रासदायक ठरत असलेल्या या झोपडपट्टीतील काही दुकानांमध्ये व घरी दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते. तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छेड काढल्या जाते. अतिशय खराब शब्दात बोलल्या जाते. कुठल्याही सामूहिक सणाला येथे दारू पिवून शिवीगाळ व भांडणे होणे नात्याचे आहे. झोपडपट्टीमध्ये कुठलीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत डिजे वाजविला जातो. त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या रोगाचा सामना करावा लागतो. घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकली जातात. याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येण्याचा प्रकार सातत्याचा झाला आहे. हा त्रास नेहमीचाच झाला असून, येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा वा घरे देऊन स्थलांतरीत करा या मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.म्हणून आज कलोडे चौक येथें रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संत तुकडोजी वॉर्डातील हुकेश ढोकपांडे, दिलीप बालपांडे,रामभाऊ मेंढे,शरद ढोकपांडे,नितीन कोल्हे,लक्ष्मण राऊत, राहुल झाडे,रमेश राऊत,सौ.शीतल राऊत, सौ.प्रभाताई घिये,सौ.मेंढेताई, सौ.दम्यंती घुळघाणे, सौ.शीतल चेले,सौ.उमा भोयर, सौ.प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी वॉर्डातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.