बच्चू कडू यांना न्यायालयानं सुनावली तीन महिन्यांची शिक्षा,कर्मचाऱ्याला धमकावले, सराकारी कामात अडथळा, बच्चू कडू दोषी

Bacchu Kadu : माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सराकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याच्या आरोपात त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांच्या कारावासीची शिक्षाही सुनावली आहे. सोबतच तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधे प्रत्येकी 5000 रुपयांचा दंडठी ठोठावला आहे.
सात वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने कडू यांना तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आमदार असल्याने त्यांना हल्ला करण्याचा परवाना मिळाला नाही अशी शब्दाने न्यायालयाने कडू यांना सुनावले आहे.
दोन कलमा अंतर्गत बच्चू कडू यांना ठरवलं दोषी
न्यायालयाने बच्चू कडू यांना कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे किंवा त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. तीन महिने शिक्षा आणि तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली. बच्चू कडू यांना लगोलग जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यलयात गेलो होतो, काय म्हणाले बच्चू कडू?
दरम्यान, मुंबई सत्र न्य्यालयानं बच्चू कडू यांना शिक्षा सुनाववल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता. त्याकाळी केंद्रात सुविधा नव्हत्या. विद्यार्थ्याचे हाल होत होते. परीक्षा प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. आयटीच्या संचालकांना याबद्दल पत्र दिले. परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यलयात गेलो होतो. त्यावेळी लॅपटॉप उचलला म्हणून त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली. व्यवस्था काही बदलत नाही असे कडू यावेळी म्हणाले.




