छायाचित्रकार विरुद्ध कॅमेरामन – फुटबॉलच्या मैदानावर मैत्रीचा जल्लोष!

नागपूर : – जागतिक छायाचित्र दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर अँड कॅमेरामन वेल्फेअर असोसिएशन तर्फे दोन वेगळ्या पण एका धाग्याने जोडलेल्या व्यावसायिकांना एका मैदानावर एकत्र आणलं – छायाचित्रकार आणि न्यूज कॅमेरामन यांच्यात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रंगला. हा उत्साही सामना छत्रपती शिवाजी महाराज पोलीस ग्राउंडवर झाला.
विशेष म्हणजे, या सामन्यास इमामवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव तसेच आशा हॉस्पिटलचे संचालक जयहरीसिंग ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चारही संघाने मैदानावर दिलेल्या दमदार खेळामुळे प्रेक्षकांची दाद मिळाली.
कार्यक्रमानंतर छोटेखानी सत्कार सोहळा घेण्यात आला. राष्ट्रीय बॉक्सिंगपटू समीक्षा प्रदीपसिंग हिचा विशेष सत्कार झाला. दिल्ली येथून मृत्युंजय सिंह, हॉटेल गोल्डन कॉइनचे संचालक बाबा केळवदे, भूपेश रामटेके व प्रदीप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. रेफरीची जबाबदारी रेमंड फ्रान्सिस व योगेश येसुर यांनी पार पाडली. तर आयोजनात मॉरिस फ्रान्सिस, फेविन पीटर, महेश टिकले, रवी साने, अनिरुद्ध कापटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्रा यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. या उपक्रमातून वृत्तछायाचित्रकार व कॅमेरामन यांच्यातील मैत्री, आपुलकी आणि टीम स्पिरिट अधिक वृद्धिंगत झाले.



