महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
दारूच्या नशेत बेदरकार कारचालकाची धडक!विमानतळाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली कार

नागपूर : दारूच्या नशेत एका बेदरकार चालकाने इलेक्ट्रिक कार चालविताना नियंत्रण सुटल्याने मोठी दुर्घटना घडली. या कारने आधी माजी दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे (SCZCC) संचालक दीपक खिरवडकर यांच्या पार्क केलेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खिरवडकर यांची गाडी थेट नागपूर शहर विमानतळाच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली.
सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून विमानतळाच्या सुरक्षा भिंतीलाही तडा गेला आहे.
घटनेच्या वेळी दीपक खिरवडकर लंडनमध्ये असल्याने त्यांची गाडी रिकामी होती. पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

