दमदार स्वप्नातून उंच भरारी” महारुद्र स्मरणिकेचे मा.आमदार संदिपजी जोशी यांच्या हस्ते प्रकाशन
गोसावी समाज, नागपूरचा रौप्य महोत्सव दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवारी पेठेतील संताजी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गोसावी समाज, नागपूरचा रौप्य महोत्सव दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवारी पेठेतील संताजी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.श्रीकांतजी गिरी, संगमनेर यांच्या हस्ते झाले, तर विधान परिषद आमदार मा.श्री.संदिपजी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रा.श्री. यशवंती गोसावी (शिवचरित्रकार) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास मा.श्री. बाळकृष्णजी पर्वत (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. गोस्वामी सभा, दिल्ली), अन्नाजी गोसावी (संपादक, गोसावी रुद्राक्ष, नाशिक), मा.श्री. शशिकांतजी पुरी (व्यसनमुक्ती केंद्र), सौ. उत्कर्षा गिरी गोसावी (राष्ट्रीय अध्यक्षा, दिल्ली), मा.श्री. चंद्रशेखर गिरी (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), श्री. गजानन भारती, बुलढाणा यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात खालील उल्लेखनीय गोष्टी घडल्या:
गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांना डॉ. प्रमोद गिरी (न्युरो सर्जन), मा.श्री. शशिकांतजी पुरी आणि महिला कार्यकारिणीच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले.
आखाडा सुरक्षा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान.
ईश्वर पर्वत, राजेंद्र गिरी, विजय वि. गिरी, संदेश भारती यांच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना सायकली वितरित.
क्रिष्णा पुरी व संदेश भारती यांच्याकडून स्मार्ट घड्याळ भेट.
प्रगतीशील शेतकरी व उद्योजक यांचा विशेष सत्कार.
प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व बालनृत्य कलाकारांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी “महारुद्र स्मरणिका – रौप्य महोत्सवी विशेषांक” चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.