घरफोडी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेची मोठी धडक – तिघांचा अटकेसह तब्बल ३ गुन्ह्यांची उकल

नागपूर : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ पोलिसांनी प्रभावी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. या टोळीने विविध भागांत घडवलेल्या तीन घरफोडी प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अमित राजेश तुकडर (वय ३८, रा. एम.एस.ई.बी. कॉलनी, हिंगणा) यांच्या घरात ३० मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गणेश नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी अनिकेत सुभाष काळे (वय २४, रा. अजनी), अमोल रमेश सोनटक्के (वय २६, रा. अजनी) व अविनाश सुभाष काळे (वय २२, रा. एमआयडीसी, नागपूर) यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे



