Uncategorized
हुडकेश्वर पोलिसांची मोठी कारवाई – ५ जुगार अड्ड्यांवर धाड, ५० जुआरी अटकेत, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी पाच जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत तब्बल ५० जुआरींना अटक करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २९ दुचाकी, २२ मोबाईल, रोख १ लाख ७५ हजार रुपये असा मिळून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेड़ोंळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अचानक झालेल्या या धाडीमुळे परिसरातील जुगार अड्ड्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




