जय भीम चौकात युवकाचा संशयास्पद मृत्यू; बहिणीने दिली पोलिसांना माहिती, नंदनवन पोलीस तपासात

नागपूर – नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय भीम चौक परिसरात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह घरात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १२ ऑगस्ट २०२५ च्या रात्री दहा वाजल्यापासून १३ ऑगस्टच्या सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली.
मृत युवकाची ओळख राजेश ज्ञानेश्वर धनविजय (वय ३०, रा. हिरवी नगर, जय भीम चौक, आशय किराणा स्टोअर्सजवळ, नागपूर) अशी झाली आहे. घटनास्थळ हे अवसरे यांच्या घरात असून, त्याठिकाणीच राजेशचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मृतकाची बहीण नगीना सुधीर दमके (वय ४२, रा. हिरवी नगर, जय भीम चौक) यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत्यू अपघाती आहे की इतर कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. परिसरातील लोकांची चौकशी सुरू असून, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे


