खापरखेडा थर्मल पॉवर प्लांटमध्ये भीषण फ्लॅशओव्हर; दोन कर्मचारी गंभीर भाजले

नागपूर : खापरखेडा थर्मल पॉवर प्लांटमध्ये रविवारी दुपारी मोठा अपघात घडला. 500 मेगावॅट क्षमतेच्या या प्लांटमध्ये फ्लॅशओव्हर झाल्याने दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले आहेत.
ही घटना दुपारी साधारण 2.15 वाजता घडली. एमसीसी रूमजवळ एफ.डी. फॅन ब्रेकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना 6.6 केव्ही लाईनवरील ब्रेकर काढण्याच्या वेळी जोरदार फ्लॅशओव्हर झाला.
या अपघातात देवाजी कुबडे कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट वर्कर सचिन भगत आणि महाजेनकोचा कर्मचारी वैभव सोनुले गंभीररीत्या भाजले. दोघांना सुरुवातीला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते त्यांच्या चेहऱ्यावर व हातांवर खोल जखमा झाल्या आहेत.
या अपघातानंतर सुरक्षा साधनांबाबतची निष्काळजीपणा समोर आला असून, सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


