महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
कोराडी मंदिरात भीषण अपघात! गेट कोसळून २५-३० मजूर जखमी, बचावकार्य सुरू

नागपूर : कोराडी मंदिर मार्गावरील एका बांधकामस्थळी शनिवारी रात्री मोठा अपघात घडला. सुमारे रात्री ८ वाजता गेटचा एक भाग अचानक कोसळला आणि २५ ते ३० मजूर मलब्याखाली अडकले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल व प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जोरदार बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.