महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीनवर बलात्कार; नागपूर पोलिसांची तत्पर कारवाई, आरोपी अटकेत

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी आरोपीस अटक केली असून त्याच्यावर बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव करीम अंसारी (वय 25) असं असून पीडित मुलगी केवळ 18 वर्षांची आहे. दोघांची ओळख दोन वर्षांपूर्वी कलमना परिसरात झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्री वाढली.

 

दि. 28 एप्रिल रोजी आरोपी करीम अंसारी पीडित मुलीच्या कॉलेजवर गेला आणि तिला फुस लावून गिट्टीखदान येथील त्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही काळानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. तब्बल तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबाने चौकशी केली असता मुलीने संपूर्ण घटना उघड केली.

यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी करीम अंसारी याला अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

या प्रकरणाची पुढील तपासणी गिट्टीखदान पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button