महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
“मनसेचं येस बँकेविरोधात आंदोलन – कर्जदाराच्या जेसीबीची बेकायदेशीर जप्ती आणि विक्रीचा आरोप!”

नागपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) येस बँकेच्या माऊंट रोडवरील शाखेविरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. हे आंदोलन कर्जदार इंद्रजित बळीराम मुळे यांच्या न्यायासाठी करण्यात आलं.
मुळेंनी येस बँकेतून जेसीबी मशीनसाठी कर्ज घेतले होते. काही हप्ते थकित राहिल्यानंतर, आरटीओमध्ये पासिंगसाठी गेले असताना, येस बँकेने संबंधित जेसीबी जप्त केली आणि परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात मुळे यांनी बँकेत वारंवार फेऱ्या मारूनही न्याय मिळत नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी मनसेकडे मदत मागितली असून, मनसेने बँकेच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन उभारलं.