महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

मयुरी बारमधून ४० हजारांची चोरी; आरोपी राजा खान अटकेत

नागपूर – राणीदुर्गावती चौकातील मयुरी सावजी बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना ३१ जुलैच्या मध्यरात्री घडली. बार मालकाने रात्री १२ वाजता बार बंद करून घरी गेल्यानंतर चोरी झाली.

१ ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा बार उघडण्यात आला, तेव्हा शटर तुटलेले दिसले. तपासात समोर आले की काउंटरमधून ₹३६,५३० रोख रक्कम आणि ₹३,७०० किमतीचे सिगारेट पॅकेट्स, अशा एकूण ₹४०,२३० किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गोपनीय माहिती व पेट्रोलिंगदरम्यान राजा खान उर्फ राजा अमरावती या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याजवळून ₹५,००० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून माल जप्त केला आहे.

सदर आरोपीवर यापूर्वीही नागपूरमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त राजेंद्र दाभाडे, उपायुक्त राहुल मदने आणि सहायक आयुक्त सौ. श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button