महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

नागपूर मेडिकलमध्ये प्राणवायू नलिकेला गळती; शस्त्रक्रिया अर्धवट, रुग्णांचा जीव धोक्यात

नागपूर:

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, म्हणजेच नागपूर मेडिकलमध्ये मंगळवारी दुपारी घडलेली घटना रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. शल्यक्रिया गृहत सुरू असलेल्या प्रक्रियेदरम्यान प्राणवायूच्या मुख्य नलिकेला अचानक गळती लागल्याने ऑपरेशन थिएटर ‘ड’ मधील सर्व शस्त्रक्रिया अडीच तासांपर्यंत ठप्प झाल्या. या काळात एक शस्त्रक्रिया सुरू असताना प्राणवायूचा पुरवठा थांबला आणि रुग्णाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली.

 

मेडिकलमध्ये सध्या नवीन एनआयसीयू, पीआयसीयू आणि शस्त्रक्रिया गृह ‘ब’ तयार होत आहेत. या कामादरम्यान कंत्राटदाराने निष्काळजीपणाने ड्रिलिंग केल्यामुळे प्राणवायूची मध्यवर्ती लाईन फुटली. त्यातून ऑक्सिजन गळती सुरू झाली आणि संपूर्ण परिसरात काही काळासाठी खळबळ उडाली.

घटनेनंतर प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठा बंद करून नलिका दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लहान सिलेंडरद्वारे तात्पुरता पुरवठा करण्यात आला. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनेची पुष्टी केली असून, “रुग्णसेवा पूर्णपणे थांबली नाही,” असा दावा त्यांनी केला.

 

मात्र, ही पहिली वेळ नाही. याआधीही ११ जानेवारी २०२२ रोजी वॉर्ड क्रमांक १ मधील ऑक्सिजन लाईनला गळती लागली होती. तसेच, ९ ऑगस्ट २०२२ रोजी डायलिसिस युनिटमधील पाईपलाईनमध्येही गळतीची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे रुग्णांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

 

आता प्रश्न असा की – मेडिकलसारख्या संस्थेत सुरक्षा उपाययोजना इतक्या फोल का ठरतात? आणि दरवेळी सुदैवाने जीव वाचतो, पण पुढच्यावेळी?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button