Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

नागपूर मनपा निवडणूक 2025 : आज जाहीर होणार नवे प्रभाग रचना प्रारूप, अनेक दिग्गजांचे गढ हलणार!

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग आज (22 ऑगस्ट) मनपा प्रभागांची नवीन रचना जाहीर करणार असून, उद्या (23 ऑगस्ट) अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या घोषणेने स्थानिक नेते व इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितात मोठी खळबळ उडाली आहे.

नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान प्रभागांचे समीकरण बदलणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे अनेक वरिष्ठ नगरसेवक व स्थानिक नेत्यांची गढी डगमगू शकते. नगर विकास योजनेअंतर्गत ही बदललेली रचना लागू होणार असून, जुन्या प्रभागांची मान्यता संपुष्टात येणार आहे.

राजकीय पक्षांनी देखील यानुसार आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आंतरिक बैठकींचा धडाका सुरू केला आहे.

राजकीय पक्षांनी देखील यानुसार आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आंतरिक बैठकींचा धडाका सुरू केला आहे.

नवीन प्रभाग रचना प्रारूप हायकोर्टसमोरील छोटे टपालघर येथे उपलब्ध होणार आहे. नागरिकांना या प्रारूपाबाबत 28 ऑगस्टपर्यंत आपत्ती अथवा सूचना नोंदवता येणार आहेत.

या बदलांमुळे मनपा निवडणुकीचे वातावरण तापण्याची चिन्हे असून, स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button