Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई — चोरीच्या 41 गाड्या जप्त, मुख्य आरोपीसह खरेदीदारही तुरुंगात

नागपूर | नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीच्या तब्बल 41 गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवणी परिसरातील असून, चोरीच्या गाड्या खरेदी करणारा एक आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व गाड्या नागपूर शहरातील विविध भागांमधून चोरीला गेल्या होत्या. वेगवेगळ्या 10 ते 12 पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक 23 गाड्या झोन-3 मधील गणेशपेठ, लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, चोरीच्या गाड्यांचा मोठा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या प्रकरणांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे.



