नागपूर शालार्थ आयडी घोटाळा : मास्टरमाईंड नीलेश वाघमारे अखेर पोलिसांच्या ताब्यात, आणखी दोघे अटकेत; आरोपींची संख्या १८ वर

नागपूर :राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मास्टरमाईंड नीलेश वाघमारे अखेर चार महिन्यांच्या फरारीनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आला असून रविवारी आणखी दोन आरोपींना गजाआड करण्यात आले.
पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील दोन कनिष्ठ लिपिक — मंगेश केशव निनावे आणि मनीषकुमार केशव निनावे — यांना अटक केली. या दोघांची नेमणूक फर्जी शालार्थ आयडीच्या माध्यमातून झाली होती. माहिती असूनही त्यांनी अनेक वर्षे वेतन घेतले आणि सरकारला तब्बल ₹४१ लाख ४९ हजारांचा फटका दिला.
या घोटाळ्यात आतापर्यंत —
३ विभागीय उपशिक्षण संचालक
३ शिक्षण अधिकारी
४ लिपिक
२ मुख्याध्यापक
२ शाळा संचालक
३ सहाय्यक शिक्षक
१ वेतन अधीक्षक
अशा मिळून एकूण १८ आरोपींना अटक झाली आहे.या घोटाळ्यामुळे शिक्षण खात्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


