नागपूरकरांना मोठा फटका! पेंच-II व पेंच-III जलशुद्धीकरण केंद्रे 36 तास बंद; शेकडो भागांत पाणीपुरवठा खंडित

नागपूर :
नागपूर महानगर पालिकेच्या पेंच-II आणि पेंच-III जलशुद्धीकरण केंद्रांवर आवश्यक देखभाल व दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण 36 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत शहरातील अनेक भागांतील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मनपाने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
प्रभावित भागांची यादी
मुख्य क्षेत्रे – ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, परते नगर, समर्थ नगरी, अध्यापक लेआउट, एलआयजी/एमआयजी/एचआयजी कॉलनी, त्रिशरण नगर, अहिल्या नगर, हिरणवार लेआउट, प्रसाद नगर, सहकार नगर, गजानन धाम, मनीष लेआउट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, जलतरंग, नेल्को सोसायटी, एनआयटी भाग्यश्री लेआउट, जेड लेआउट, अष्टविनायक नगर, कॉसमॉस टाउन, राधेश्याम नगर, संघर्ष नगर.
जयताळा जीएसआर सीए क्षेत्र – रमाबाई आंबेडकर नगर, डेट लेआउट, वडस्कर लेआउट, शिव विहार, विजय विहार, हिरणवार लेआउट, जनहित सोसायटी, एकात्म नगर, दादाजी नगर, वानखेडे लेआउट, फकीदे लेआउट, जयताळा स्लम, महिंद्रा कॉलनी, ठाकरे लेआउट, शारदा नगर, साई लेआउट, भांगे लेआउट.
त्रिमूर्ती नगर सीए क्षेत्र – सोनेगाव, पनासे लेआउट, एचबी स्टेट, सहकार नगर, गजानन धाम, पैराडाइज सोसायटी, ममता सोसायटी, समर्थ नगर, विजय सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, लोकसेवा नगर, मनीष लेआउट, साईनाथ नगर, आदर्श कॉलनी, प्रियदर्शिनी नगर, अमर आशा लेआउट, फुलसंगे लेआउट, भुजबल लेआउट, गेदम लेआउट, गुड्डे लेआउट.
राम नगर ईएसआर सीए क्षेत्र – गोकुळपेठ, राम नगर, मरारटोळी, तेलनखेड़ी, तिलक नगर, भारत नगर, हिंदुस्तान कॉलनी, वर्मा लेआउट, नवा वर्मा लेआउट, अंबाझरी लेआउट, समता लेआउट, यशवंत नगर, हिलटॉप, अंबाझरी स्लम, पांडरबोडी, संजय नगर, ट्रस्ट लेआउट, मुंजे बाबा स्लम.
प्रशासनाचे आवाहन
मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही भागात अल्पदाबाने पाणी मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा.



