नागपूरमध्ये नशेत BMW फुटपाथवर चढवली; गाडीतून देसी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त

नागपूर : नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मद्यधुंद तरुणाने बीएमडब्ल्यू (BMW) गाडी थेट फुटपाथवर चढवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि जेव्हा गाडीची झडती घेतली, तेव्हा गाडीमधून एक देसी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि लाखो रुपयांची कार सापडली.
ही घटना 1 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 12 ते 12:30 दरम्यान जुनी शुक्रवारी परिसरातील शनिमंदिराजवळ घडली. बीट मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी राहुल लक्ष्मण चुडे यांना डायल 112 वरून माहिती मिळाली की, एक व्यक्ती नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, प्रेम नगर श्रीरामवाडी येथील रहिवासी शुभम सुनील महल्ले (30 वर्षे) हा इसम BMW गाडीसह मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याची गाडी फुटपाथवर चढवलेली होती.
पोलिसांनी आरोपीस कोतवाली पोलिस ठाण्यात आणून BMW कारची झडती घेतली असता, देसी बनावटीचे पिस्तूल (माउझर) मॅगझीनसह — अंदाजे किंमत ₹25,000,पितळी धातूचे एक जिवंत काडतूस — अंदाजे किंमत ₹1,000,BMW चारचाकी वाहन — अंदाजे किंमत ₹9,00,000
असा ऐकून 9,26,000 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला