नागपुर RPFची मोठी कारवाई : २७ लाखांचे सोने घेऊन फरार आरोपी गोंदियात पकडला

गोंदिया | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मोठी कामगिरी करत तब्बल २७ लाखांचे सोने घेऊन फरार झालेल्या आरोपीला गोंदिया स्थानकावर पकडले.
घटना
पश्चिम बंगालमधील नेहाटी भागातील एका दागिन्यांच्या दुकानातील कारागीर १७ ऑगस्ट रोजी २७६ ग्रॅम सोने घेऊन फरार झाला होता. नेहाटी पोलिस ठाण्याकडून ही महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर नागपूर मंडळ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी तातडीने गोंदिया RPF आणि गुन्हे गुप्तचर शाखेला सतर्क केले.
अटक
गाडी क्रमांक १२८३४ गोंदिया स्थानकात दाखल होताच सघन तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी आरोपी अतुल सतीश जाधव (मूळ सांगली, महाराष्ट्र) आपल्या कुटुंबासोबत कोच B-7 मध्ये प्रवास करताना सापडला. तपासात त्याच्याकडून २७ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.
पुढील कारवाई
RPFने तातडीने पश्चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची खात्री केली.
आरोपीला गोंदिया RPF पोस्टवर आणून ताब्यात घेण्यात आले.
नेहाटी पोलिसांची विशेष टीम नागपूर मंडळात दाखल होत असून, ते आरोपीला ताब्यात घेणार आहेत.




