Nagpur Student Bike Stunt : रिल्सचा नाद, जीवाशी खेळ, शाळकरी मुलांचा बुलेटवर स्टंट

नागपूर शहरात सोशल मीडियाच्या ‘रिल्स’च्या नादापायी काही शाळकरी मुलांनी जीवाशी खेळ करत रस्त्यावर धोकादायक बाईक स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अल्पवयीन विद्यार्थी बुलेट मोटारसायकलवर बिनधास्तपणे ‘व्हीली’ व इतर स्टंट करताना दिसत आहेत.
घटनास्थळ मध्य नागपूर परिसर असल्याचे सांगितले जात असून, व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्यांनी वाहतुकीचे नियम, हेल्मेटसह सर्व सुरक्षाविषयक बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नागरिकांनी हा प्रकार पाहून नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाने संबंधित बाईकचा क्रमांक शोधून वाहन मालकावर व विद्यार्थ्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच अल्पवयीन मुलांना बाईक देणे हा मोटार वाहन कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावरील ‘लाईक’ आणि ‘फॉलोअर्स’च्या हव्यासात असे प्रकार वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.