महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपुरात गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून, कंट्रोल रूमवर 112 क्रमांकावर फोन करून “10 मिनिटांत गडकरी यांचे घर उडवतो” अशी धमकी दिली गेली होती.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी कॉल ट्रेस करून आरोपी उमेश विष्णू राऊंत (रा. तुलसी बाग रोड, महाल; सध्या रा. विमा दवाखाना, सक्करदारा) याला नागपूरच्या सिव्हिल लाईन भागातून ताब्यात घेतले. आरोपी लोकप्रिय देसी दारू दुकान, मेडिकल चौक येथे कामाला असून, त्याने मानसिक तणावाखाली ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर नितीन गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरू आहे.