Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेश योजना; अर्जाची अंतिम तारीख 17 ऑगस्ट

नागपूर : – राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे. या योजना ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जात असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.



