ऑपरेशन शक्ती: नागपूरच्या गणेशपेठेत देहव्यापार रॅकेटचा भंडाफोड, पाच पीडित महिला सुटका

नागपूर : – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत गणेशपेठ परिसरात सुरु असलेल्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई 1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:40 पासून मध्यरात्री 12:30 पर्यंत करण्यात आली.
छापा गणेशपेठ बसस्टँड चौकाजवळ, स्वॅग स्टे राहुल हॉटेलसमोरील परिसरात टाकण्यात आला.
यावेळी सुमित ईश्वर घाटे (वय 28, रा. हिंगणा रोड, नागपूर) याला अटक करण्यात आली. तर राहुल आणि सचिन नावाचे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण ₹91,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात ₹21,000 रोख रक्कम आणि अंदाजे ₹70,000 किंमतीचा iPhone यांचा समावेश आहे
या कारवाईत सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या महिला इतर राज्यांतून आणल्या गेल्या होत्या आणि आर्थिक फायद्याच्या आमिषाने त्यांना या धंद्यात ढकलण्यात आले होते.
या प्रकरणात पोलीस शिपाई कुणाल मसराम यांनी तक्रार दाखल केली असून, आरोपी आणि पीडित महिलांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पुढील तपास गणेशपेठ पोलिस ठाणे करत आहे.