पारडी पोलिसांची धडक कारवाई; तब्बल 4.70 लाखांचा देशी दारूचा साठा जप्त, एक जेरबंद – एक फरार

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट-05 ने पारडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अवैध दारू व्यवसायाला चपराक दिली आहे. गुप्त माहितीनुसार करण्यात आलेल्या धाडीत तब्बल ₹4,70,400 किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईत एक आरोपी ताब्यात घेतला असून त्याचा मुलगा फरार आहे.
दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी खाटीकपुरा परिसरात, संतोषी माता मंदिराजवळील प्लॉट क्र. 1915 येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी राजकुमार जयनारायण जैस्वाल (वय 56 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. तर त्याचा मुलगा यश राजकुमार जैस्वाल (वय 19 वर्षे) हा पाहिजे आरोपी असून तो फरार आहे.
35 बॉक्समधील भिंगरी संत्रा नं. 1 (180 ml) – 1,680 बाटल्या, किंमत ₹1,34,400,80 बॉक्समधील भिंगरी संत्रा नं. 1 (90 ml) – 8,000 बाटल्या, किंमत ₹3,20,000,संत्री 5000 टायगर झाप (90 ml) – 400 बाटल्या, किंमत ₹16,000 एकूण मुद्देमालाची किंमत ₹4,70,400 इतकी आहे.
आरोपीने अवैधरित्या देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई), 83 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीला पुढील तपासासाठी पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



