महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
साकोलीचा मुख्य तलाव फुटला, सर्वत्र जलमय परिस्थिती

भंडाऱ्याच्या साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसापूर्वीचं व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केल्यानं आज पहाटे हा तलाव फुटला. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं परिसरामधील शेतशिवारात सध्या जलमयस्थिती निर्माण झालेली आहे. तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.