महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
शरद पवारांच्या यात्रेत पाकिटमारांचा धुमाकूळ: दुणेश्वर पेठे यांच्या खिशातून तब्बल 20 हजार लंपास

नागपुरात शरद पवार यांच्या उपस्थितीत निघालेल्या मंडळ यात्रेत पाकिटमारांनी गर्दीचा फायदा घेतला. अनेक नेत्यांच्या खिशातून रोख रक्कम आणि पाकिटं लंपास करण्यात आली. शरद पवार मंडळ यात्रेसोबत वरायचे चौकावर असताना एक पाकिटमार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या हाती लागला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडून चोरलेले पाकीट जप्त केले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष धोनेश्वर पेठे यांच्या खिशातूनही वीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे