Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक – नागपुर पोलिसांनी अमरावतीतून मुख्य आरोपीला केली अटक

नागपूर – बेलतरोडी पोलिसांनी सरकारी नोकरी भरती घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश करत मुख्य आरोपी प्रकाश उर्फ जगदीश धनराज राठोड याला अमरावतीतून अटक केली. आरोपी पोलिस विभाग, आरोग्य विभाग, मेट्रो, रेल्वे आणि लष्करात भरती करून देण्याचे आमिष दाखवून इच्छुक तरुणांकडून लाखो रुपये उकळत होता.

 

चौकशीत उघड झाले की आरोपीने स्वतःला अमरावती पोलीस आयुक्तालयात लिपिक म्हणून दाखवून बनावट पोलीस आय-कार्ड आणि नियुक्ती पत्रे तयार केली. त्याद्वारे समाजात विश्वास संपादन करून अनेकांना बनावट सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात घेतलेली रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यांमध्ये जमा केली. आरोपीचा कुठलाही कायमस्वरूपी पत्ता नसून, तो सतत जिल्हे बदलून गुन्हे करत होता.

 

आरोपीविरुद्ध यापूर्वीच फसवणूक, जाळसाजी आणि धमकी देण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, यवतमाळच्या अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकरणात तो बराच काळ फरार होता.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सरकारी नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, कारण भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर आहे. कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करून पीसीआर रिमांडवर घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button