महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

वीज वितरणात खासगीकरणाचा डाव; नागपुरात टॉरेन्टला विरोधाचा सूर

नागपूर : राज्यातील विविध शहरांमध्ये वीज वितरणासाठी टॉरेन्ट, अदानी, रिलायन्स यासारख्या खासगी कंपन्यांनी परवान्यांसाठी लॉबिंग सुरू केली आहे. एका शहरात एकाच कंपनीला परवाना मिळवून देण्यासाठी डाव रचला जात असल्याचा आरोप महावितरणसह विविध संघटनांनी केला आहे.

नागपुरातील टॉरेन्ट पॉवरच्या परवान्यासाठीही तीव्र विरोध दर्शवण्यात आला. महावितरणचे कर्मचारी संघटनांनी याला तीव्र आक्षेप घेत केंद्राकडून देण्यात आलेल्या हजारो कोटींच्या सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, या सुविधांचा लाभ घेऊनच टॉरेन्टसारख्या कंपन्या फक्त फायदेशीर शहरेच निवडून वितरणाची मागणी करत आहेत.

दुसरीकडे टॉरेन्टने दावा केला की, स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी दरात वीज मिळेल व सेवाही उत्तम राहील. मात्र, महावितरणचे प्रतिनिधी म्हणाले की, ग्रामीण व तोट्यातील भाग डावलून केवळ शहरी भाग निवडणे हे अन्यायकारक आहे. स्मार्ट मीटरिंग व अतिरिक्त बिलांचेही प्रश्न मांडले गेले.

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनने टॉरेन्टच्या अहवालातील त्रुटी दाखवत कंपनीकडून दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली. महावितरणने याचिका रद्द करण्याची शिफारस केली असून, वितरणात स्पर्धा हवी पण ती पारदर्शक व सर्वसमावेशक असावी, अशी भूमिका मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button