“१६ वर्षांपासून अध्यक्ष पद भूषवणारे राजू नागुलवार यांच्या गैरव्यवहारांचा पाढा उघड पद्मशाली समाजात संताप, राजीनाम्याची मागणी”

नागपूर : – पद्मशाली समाजाच्या नावाने गेल्या १६ वर्षांपासून अध्यक्ष पद भूषवणारे राजू नागुलवार यांच्यावर समाजातील सदस्यांनी गंभीर गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उचलून धरला.
माहितीनुसार, श्री मार्कंडेय मंदिर व मार्कंडेय सभागृहाच्या नावाने समाजाकडून उभारण्यात आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मार्कंडेय सभागृहावर ७० लाख रूपये खर्च केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे प्रत्यक्षात केवळ २०-२५ लाखांचा खर्च होतो. हिशोबात तब्बल ४५-५० लाख रुपये गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय, मार्कंडेय सभागृह १५-२० कोटींच्या मालमत्तेचे विक्री करून दुसरीकडे शेती घ्यावी असा विचार सुरु असल्याचाही आरोप पत्र परिषदेत करण्यात आला, भूखंडांचे बेकायदेशीर विक्री व्यवहार, समाजाच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांची १-१.५ लाख रुपये भाड्याने खासगी व्यक्तींना बेकायदेशीर भाडेतत्वावर देणे, तसेच वीज कनेक्शनसाठी घेतलेल्या २० रु प्रमाणे घेतलेले सभागृहाचे बीलचे हिशोब न देणे असे अनेक घोटाळे उघड झाले आहेत.
समाजातील सदस्यांचे आरोप असे की, राजू नागुलवार अध्यक्ष असूनही ५०% पेक्षा जास्त कामांमध्ये एकहाती निर्णय घेतात आणि सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नाही.
यामुळे समाजात प्रचंड असंतोष पसरला असून, अनेकांनी राजू नागुलवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. समाजातील आक्रोश इतका वाढला आहे की, लवकरच मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला
पत्रकार परिषदेत उपस्थित समाज नेत्यांनी स्पष्ट केले की, “जर गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे उत्तर देण्यास तयार नसतील तर अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.”
या पत्रकार परिषदेतील प्रमुख लोकांमध्ये –
श्री रमेश तोक्कलवार, श्री नरेश इरमलवार, श्री पराग मार्गनवार, श्री राजेश चिलकेवार, श्री आकाश माडेवार, श्री गिरीश परसावार, श्री आशिष मलपेट्टीवार, श्री महेश कुचनवार व श्री रविराज दासरबार यांचा समावेश होता.




