Uncategorized

आणखी एकाचा मृत्यू..

नागपूर : शहराजवळच्या बाजारगाव परिसरातील सोलरएक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणात महत्वाची माहिती पुढे येत आहे. या घटनेत अत्यवस्थ असलेल्या ११ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन वर पोहचली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय यंत्रणेकडूनही सुरू झाला आहे.

निकेश इरपाची असे दगवलेल्या रुग्णाचे नाव आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या व्हाट्सएप ग्रुपवर ही माहिती त्यांचे जनसंपर्क अधिकारी उज्वल भोयर यांनी प्रसारित केली आहे. दरम्यान शहराजवळच्या बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणेकडून तपासणी सुरू झाली आहे. विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची झडती घेतली. तसेच कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाकडून संबंधित माहितीसुद्धा मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात मयूर गणवीर (२५ रा. चंद्रपूर) या कंपनी सुपरवायझरचा जागीच मृत्यू तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेचे गांभिर्य बघत पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना (पी.ई.एस.ओ.), उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (एच.ई.एन.आर.एल.), अग्नि, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा केंद्र (सी.एफ.ई.ई.एस.), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डी. आय. एस.एच.), स्थानिक पोलिसांसह इतर यंत्रणेकडून घटनेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेशी संबंधित काही विशिष्ट माहिती मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या यंत्रणेच्या सूक्ष्म तपासणीनंतरच घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button