बाजारगावच्या सोलर कंपनीत मृतक कामगारांना 50 लाखाची मागणी: स्वप्नील वानखेडे
बाजारगावच्या सोलार कंपनीवर आळा घाला ? महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल वानखेडे

नागपूर : नागपूर ते अमरावती रोड वरील कोंढाळी मार्गावर सोलर कंपनी आहे. बाजारगाव सोलर एक्स्प्लोझिव्ह कंपनीत बुधवारच्या मध्यरात्री 3 सप्टेंबर ला रात्री साडेबारा वाजता भिषण स्फोट झाला. त्यामध्ये सतरा ते अठरा कामगार जखमी झाले. त्यामधील एकाचा मृत्यु झाला. व चार कामगारांची चिंताजनक परिस्थिती असून ते आसीयुसीमध्ये भरती आहे अशी माहिती अध्यक्ष स्वप्निल सुरेशराव वानखेडे यांना प्राप्त झाली.
महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेची मागणी आहे की, सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्ट मध्ये मृतकाला 50 लाख रुपये व जखमीला दहा ते पंधरा लाख रुपये देण्यात यावे व जो व्यक्ती काम करू शकत नाही त्या व्यक्तींच्या परिवारातील १ व्यक्तीला कंपनीमध्ये नोकरी देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचे अध्यक्ष श्री स्वप्निल सुरेशराव वानखेडे यांनी केली आहे.
ही मागणी पूर्ण न झाल्यास संघटनेतर्फे सोलार कंपनी पुढे साखळी उपोषण करणार असल्याची माहिती दिली आहे. वारंवार होत असलेले दुर्घटनेमुळे स्थानिक कर्मचाऱ्यांचे शोषण करून बारा ते तेरा हजार रुपयांमध्ये कामगार आपला जीव धोक्यात टाकून सोलार मध्ये काम करीत आहे. परंतु त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिनीमम वेजेस मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही नियमांमध्ये बसत नसल्यामुळे PF व ESIC मिळत नाही. बेरोजगारी असल्यामुळे स्थानिक कामगार आपला जीव धोक्यात टाकून काम करीत आहे. बाजारगावच्या सोलार कंपनीत वारंवार दुर्घटना होत असते आणि कामगार आपले जीव धोक्यात टाकून कामगार काम करतात. याला आळा घालण्यासाठी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांनी केली आहे.




