बंदीस्त नायलॉन मांजावर पोलिसांची मोठी कारवाई:लाखोंचा बंदीस्त नायलॉन मांज जप्त

नागपूर | शहरात येणाऱ्या मकरसंक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदीस्त नायलॉन मांजाचा प्रचंड साठा जप्त केला आहे. ही कारवाई ठाणे, नंदनवन पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हुसैन सरफराज खान (वय ३२, र. हसनबाग, कत्रस्तानजवळ, गली नं. २, नागपूर) याच्याकडे प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यात पोलिसांनी पुढीलप्रमाणे माल जप्त केला –
1. MONOFIL GOLD MANJA, NOT USE FOR KITE FLYING या लेबलचा पॅक – एकूण १९१ नग, किंमत रु. १,३४,४००/-
2. MONO KITE MANJA या लेबलचा पॅक – एकूण २४० नग, किंमत रु. २,४०,०००/-
अशाप्रकारे एकूण ३,७४,४००/- रुपये किमतीचा बंदीस्त मांजाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने हा मांजा आगामी मकरसंक्रांत उत्सवात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई मा. श्री रश्मिता राव (भा.पो.से.), परिमंडळ क्र. ०४, नागपूर शहर व मा. श्री प्रदीप शिरसट, सहायक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




