मोजमज्जा करण्यासाठी तेल गोदामात घरफोडी; ई-रिक्शा चालकासह एक अटक, दोन फरार,४७ हजाराचा मुद्देमाल जप्त

नागपूर :
मोजमज्जा करण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीच्या कळमना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे पाच दिवसांपूर्वी भारतवाडा येथील तेलाच्या गोदामात झालेली ४७ हजार रुपयांची घरफोडी उघडकीस आली आहे. कळमणा पोलिसांनी या प्रकरणात ई-रिक्शा चालक असलेल्या एका आरोपीला अटक केली असून, त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
अटक आरोपी राहुल याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारांसह भरतवाडा रोडवरील गोदाम फोडून 24 पिपे तेलाची चोरी केली. या पिप्यांवर ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी’ आणि ‘सोयाबीन रिफायन आयल’ अशी नावे लिहिलेली होती. प्रत्येकी पिप्याची किंमत २१,७० रुपये असून, पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ४७ हजार ६४० रुपये एवढी आहे.
गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर कळमणा व इतर पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी आणि दरोडा असे गंभीर गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत.




