दहा दिवसानंतर आज बाप्पा निघणार गावाला, भक्तिमय वातावरण, शहरात उत्साहाचा पूर

विघ्नहर्त्याची दहा दिवस मनोभावे पुजा केल्यानंतर सर्वांचा लाडका बाप्पा आज शनिवारी आपल्या गावाला निघणार आहे. गेले काही दिवस भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणाऱ्या चिंतामणीचे विसर्जन केले जाणार आहे. शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांतील असे लाखो बाप्पांचे पुढील तीन दिवस शहरातील विविध ठिकाणी विसर्जन होईल. गोरेवाडा, कोराडी येथे मोठे बाप्पा तर, दहाही झोननिहाय ४१९ कुत्रीम तलावांची व्यवस्था करपयात-आली आहे. बाप्पांच्या मार्गात विघ्न नको म्हणून प्रशासना तर्फे आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे.
गणेशोत्सवापासून सुरू होणारे उत्सवी वातावरण पुढील आणखी काही दिवस असेच प्रफुल्लीत राहणार आहे. प्रशासनाकड़ून अशा उत्सवी वातावरणासाठी सर्वं प्रकारची सोईसुविधा केल्या गेल्या आहेत. दरम्यान, मनपा आयुक्त अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी कोराडी, कोलार नदी, गोरेवाड, पोलीस लाईन टाकली, विसर्जन स्थळाची पाहणी केली.



