Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
एअरफोर्स क्वार्टरसमोर 10 फूटाचा अजगर, वन्यजीव कार्यकर्त्यांनी सुरक्षित जंगलात सोडला

नागपूर :
शहरात भीतीदायक प्रसंग घडला. एअरफोर्स क्वार्टरसमोर ९ ते १० फूट लांबीचा अजगर साप उशिरा रात्री तब्बल ११ वाजताच्या सुमारास दिसला. अचानक समोरून विशाल अजगर रस्ता क्रॉस करत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांची चांगलीच भीड उसळली.
नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती वाइल्ड एनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीच्या टीमचे अध्यक्ष शुभम जी.आर. यांना दिली. माहिती मिळताच शुभम जी.आर. स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि कौशल्याने अजगराचा सुरक्षित रेस्क्यू करून त्याला परत जंगलात सोडण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी या धाडसी व जीव वाचविणाऱ्या कार्यासाठी शुभम जी.आर. व त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.
शहरातील नागरिकांना नेहमीच आवाहन केले जाते की अशा प्रसंगी घाबरून न जाता तातडीने संबंधित वन्यजीव संघटना अथवा तज्ज्ञांशी संपर्क साधावा.



