Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
एमडी तस्करी करणारा आरोपी मानकापूर पोलिसांच्या जाळ्यात : 22 हजाराच्या अमली पदार्थांसह अटक

नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांचा मोठा साठा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईत आरोपीकडून एमडी (मेफेड्रोन) सहित इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयिताची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे एमडीचा साठा सापडला. आरोपी अमली पदार्थ विक्रीसाठी ठेवत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.



