Uncategorized

फार्महाऊसमध्ये चार खरगोश गिळून बसला ‘विशाल अजगर’! सर्पमित्रांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना

नागपूर ( माहूरझरी): माहूरझरी येथील डी.के. फार्महाऊसवर बुधवारी एक थरारक घटना घडली. समीर शेख यांच्या फार्महाऊसमध्ये अचानक एक विशाल ‘भारतीय अजगर’ (Indian Rock Python) आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फार्ममधील पाळीव प्राणी – खरगोश, बदक, कोंबड्यांमध्ये अफरातफर उडाली होती.

 

ही माहिती मिळताच वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सर्पमित्र आनंद शेळके आपल्या सहकाऱ्यांसह – वीरेंद्र मेंढे आणि प्रज्वल अंबाडरे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फार्महाऊसची पाहणी केली असता, एका कोपऱ्यात अजगर कुंडली मारून बसलेला दिसला. पाहता पाहता अजगराने आपल्या तोंडातून चार खरगोश एकामागोमाग एक बाहेर काढले.

 

संपूर्ण बचाव कारवाई अतिशय काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. अजगर सुरक्षितपणे पकडून गोरेवाडा जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

 

फार्महाऊसचे मालक समीर शेख यांनी या घटनेमुळे दिलासा व्यक्त करत सर्पमित्रांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button