गर्लफ्रेंडचे शौक आणि नशेने 19 वर्षीय युवकाला बनवल चोर; क्राइम ब्रांचची मोठी कारवाई, ११ घरफोड्यांचा उलगडा – २० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : गर्लफ्रेंडच्या महागड्या शौकासाठी आणि नशेच्या व्यसनासाठी १९ वर्षीय नमन पेठे चोरीच्या मार्गाला लागला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेवतीनगर येथील जैन अपार्टमेंटमधील १४ सप्टेंबरच्या चोरी प्रकरणाचा तपास करताना क्राइम ब्रांच युनिट ४ ने त्याला हुडकेश्वर परिसरातून अटक केली.
चौकशीत नमनने कबूल केले की, शहरातील तब्बल ४० फ्लॅट्समध्ये तो सेंधमारी करण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्यापैकी ११ घरफोड्या यशस्वी झाल्या.
पोलिस तपासात समोर आले की नमन गेल्या महिनाभरापासून आपल्या गर्लफ्रेंडसोबत ओयो हॉटेलमध्ये राहत होता. हॉटेलमध्ये राहण्यासाठी आणि गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी त्याने तब्बल २ लाखांहून अधिक रुपये खर्च केले होते. त्याच्या नशेच्या व्यसनामुळे चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे देखील उघड झाले.
आरोपीच्या निशानदेहीवरून पोलिसांनी तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण परिसरातही तो चोरीच्या प्रयत्नात गुंतलेला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.



