जारीपटका गोळीबार प्रकरणी:चार सूत्रधार अटक… उत्तरप्रदेश आरोपीना दिली होती लुटीची सुपारी

नागपूर :- कडबी चौकाजवळील बेझनबाग रोडवर व्यवसायी राजीव रूपचंद दिपानी (47) याच्यावर १० सप्टेंबरच्या रात्री गोळीबार करून 50 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. या प्रकरणात लुटीचा कट रचणाऱ्या ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६ आरोपी अद्याप फरार आहेत.
सिमरजितसिंग संधु (40) रा. पंजाब, शेख हसेन उर्फ जावेद शेख बशीर सवारे (37) रा. वाठोडा, अब्दुल नावेद अब्दुल जावेद (33) रा. बजेरीया आणि सय्यद जिशान सय्यद रहेमान ( 32 ) रा. जाफरनगर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यवसायिकाकडे मोठ्या प्रमाणात हवालाचा पैसा येत असल्याची माहिती एका आरोपीला होती. त्याने मित्रांच्या मदतीने उत्तरप्रदेशातील आरोपींना सुपारी दिली, अशी माहिती पोलिस आयुक्त ‘रवींद्रकुमार सिंगल यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
सिंगल यांनी सांगितले की, पोलिस सतत सीसीटीव्ही कॅमेरा फुटज आणि मोबाईलचा डम्प डाटा शोधत होते.
आरोपी जावेद शेख हा पएका ट्रान्स्पोर्टमध्ये काम करतो. त्याच्या मालकाच्या नावे अमरावतीहून काही रक्कम राजीवच्या कार्यालयात आली ती रक्कम घेण्यासाठी जावेद राजीवच्या कार्यालयात गेला होता. तेव्हा त्याला राजीवच्या कार्यालयात हवालाची रक्कम येत असल्याचे समजले.
राजीव म्हणतो 50, आरोपी म्हणतात 19 लाख चौकशीदरम्यान राजीवने 50 लाख लुटण्याची माहिती दिली मात्र अटकेतील आरोपी 19 लाख रुपये लुटल्याचे सांगत आहेत. आरोपींनी लुटलेल्या 19 लाखापैकी 15 लाख उत्तरप्रदेशातील आरोपी घेऊन गेले. त्यापैकी 1 लाख 80 हजार रुपये सिंधूने त्याच्या पतीच्या खात्यात टाकले. नंतर हैदराबादकडे प्रवासात एक लाख रुपये खर्च केले. इतर 6 आरोपी उत्तरप्रदेश कडे रवाना झाले. पोलिसांनी आरोपींकडून 2 कार, 3 दुचाकी, देशी बनावटीचे पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, रोख 65 हजार, 5 मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




