कामठी लाईनवर बांधलेल्या जगातील सर्वात लांब डबल-डेकर उड्डाणपूलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नागपूर: महामेट्रो नागपूरने आपला आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून, कामठी महामार्गावरील डबल डेकर वायाडक्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील “सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक्ट (मेट्रो)” म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवास्थान रामगिरी येथे हा कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसचे स्वप्नील डांगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी महा मेट्रोच्या वतीने संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी, एनएचएआयच्या वतीने प्रादेशिक अधिकारी राकेश सिंग, प्रकल्प संचालक सी एम सिन्हा व इतर अधिकारी उपस्थित होते. कामठी महामार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो वायाडक्ट आहे. 5626.44 मीटर आहे. सर्वाधिक लांबीचा हा डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिअरवर उभा असून स्थापत्य कलेचा अद्भूत उदाहरण आहे.सदर डबल डेकर वायाडक्टचे लोकार्पण केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते. उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रोने वर्धा मार्गावर तयार केलेल्या डबल डेकर वायाडक्ट (मेट्रो) 3.14 कि.मी. ज्यामध्ये ३ मेट्रो स्टेशन उज्ज्वल नगर, जय प्रकाश नगर, छत्रपती चौकचा समावेश आहे त्याचे देखील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली होती आणि 6 डिसेंबर 2022 रोजी मेट्रो भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महामेट्रोला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते.
#डबल डेकर उड्डाणपूलाची ठळक वैशिष्ट्ये
• 5626.44 मीटर डबलडेकर उड्डाणपूल सर्वाधिक लांबीचा हा डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिअरवर उभा असून स्थापत्य कलेचा अद्भूत उदाहरण आहे.
• यासोबतच तंत्रज्ञानाचा अतुलनीय वापर करून उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक,कडबी चौक,इंदोरा चौक,नारी रोड,ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत.
• 5.637 कि.मी. किमी लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल हा चारपदरी आहे.
• या उड्डाणपूलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग आहे, दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावत आहे आणि जमिन पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे.
• गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे देशात पहिल्यांदाच १६५० टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात आले. देशातील ही पहिली रचना आहे, ज्यामध्ये चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे.
• उड्डाणपुलाच्या संरचनेत ‘रिब अॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
• या उड्डाणपूलाचे बांधकाम अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड होते. विशेषत: गड्डीगोदाम येथे असलेला भूमिगत मार्गातील वाहतूक आणि रेल्वे मार्गावर सतत रहदारी असल्यामुळे भारतीय रेल्वेकडून एकूण 24 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
• या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येत असल्याने वेळ व इंधनाचीही बचत होत आहे.
• वर्धा आणि कामठी या दोन्ही बहुस्तरीय मार्गाची बेरीज केली तर महामेट्रोने सुमारे 9 किमीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे.
*डबल डेकर व्हायाडक्टचे फायदे:*
• अतिरिक्त जमीन संपादन टळले (जमिनीचा खर्च, पुनर्वसन टळले)
• बांधकामाचा वेळ व खर्च कमी




