कामठी रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे साम्राज्य : कधी जाग होणार प्रशासन

नागपूर : प्रभाग क्र. 2 कामठी रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रोडावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑटोमोटिव्ह चौकातील वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी तर होतेच आहे, पण अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.
ऑटोमोटिव्ह चौका पासून साई मंदिर पिवड़ी नदी पर्यंत सतत पाणी साचत असल्याने नागरिक आणि वाहनचालक संतप्त झाले आहेत. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी नजरेस न पडल्याने दुचाकीस्वारांची मोठी अडचण होत आहे. अनेक वेळा लहान अपघातही घडल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिक भागवत यादव , सतीश पाली, बलवंत सिंग, अनिल कोटांगले, नरेश ठाकुर
यानी संगीतले पाणी साचल्याने अपघातांची शक्यता वाढली
भागवत यादव आणि सतीश पाली यांनी प्रशासनाकडे त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असूनसुद्धा येथे कोणतेही दुरुस्तीचे काम होत नाही. रोज होणारी वाहतुकीची कोंडी
आणि अपघातांची शक्यता ही गंभीर बाब आहे. नागरिकांची मागणी आहे की, संबंधित प्रशासनाने तातडीने चौकातील खड्डे बुजवावेत आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, जेणेकरून नागपूरकरांना आणि या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल.




